169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'!

विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात मराठी साहित्यात एका विलक्षण कलाकृती साकारली गेली, ती म्हणजे 'सव्यसाची'! या कादंबरीत विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती विशद करण्यात आली आहे. जागतिकीकरणाच्या वाटेवर असलेल्या भारतातील बंगालमध्ये त्यावेळी काय उलथापालथ होत होती, सव्यसाचीची भूमिका काय, या कादंबरतील इतर पात्रं कशी साकारली, नवी स्वप्नं पाहणाऱ्या समाजाचं काय झालं या सगळ्यावर भाष्य करणारी सव्यसाची लेखक संजय सोनावणी यांच्या लेखणीतून साकारली गेली. या कादंबरीचा प्रवास कसा होता, या कादंबरीत जिवंतपणा असावा यासाठी सोनावणी यांनी थेट बंगाल गाठलं, त्यांचा हा प्रवास खुद्द त्यांच्याच शब्दांतून ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... सोनावणींसोबतचा हा संवाद रंगवला आहे संतोष देशपांडे यांनी.

या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, प्रसाद मिरासदार यांच्याकडून.

सव्यसाची ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/2432515-Savyasachi

सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

2356 232