'आठवणी काही तिच्या..... काही तिला कळवायच्या.'
बोलता बोलता एखादा शब्द उच्चारला की आपल्या मनात खूप खोलवर रुजलेला एक संदर्भ पट्कन वर येतोच. तो संदर्भ आठवण्याच काहीच कारण नसत, पण तो शब्द आपल्याला हटकून एक वि शेष आठवण करून देतो. आणि मग प्रत्येकजण, आपल्या त्या संदर्भा च्या आठवणींत रमतो. जस "पाऊस" म्हटलं की कोणाला पहि ला पाऊस आठवतो, तर कोणाला पावसावरची कवि ता, आणि कोणाला आठवतो अवकाळी आलेला मुसळधार पाऊस, २६/७ ची आठवण जागवणारा. "पाऊस" एकच पण प्रत्येकाच्या मनातली त्याची आठवण वेगळी.....संदर्भ वेगळा. साधे रोजचेच प्रसंग, पण गप्पा रंगात जातात, आठवणी उलगडत जातात . अशाच ह्या आठवणी………… तुमच्या गप्पा रंगवणाऱ्या, तुम्हाला भूतकाळात नेणाऱ्या.