संतसाहित्याचा माध्यमस्पर्श...

महाराष्ट्र ही संतांच्या विचारांनी समृद्ध झालेली भूमी आहे. येथील साहित्य, संस्कृती आणि व्यवहाराची पाळेमुळे संतविचारांतूनच रुजलेली आहेत. मात्र, माध्यमांमध्ये त्याचे पुरसे प्रतिनिधित्व होते आहे का, त्यात नवे प्रयोग कोणते पाहावयास मिळतात, नव्या पिढीला संतांचे विचार म्हणजे नेमके काय, हे कसे समजावून सांगता येईल...या व अशा अनेक बाबींची सहज उलगड होते ती, विविध माध्यमांमध्ये मुशाफिरी करणारे संतसाहित्याचे अभ्यासक, संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्याशी संतोष देशपांडे यांच्यासमवेत रंगलेल्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि इतरांपर्यंतही जरुर पोहोचवावा, असा स्टोरीटेल कट्ट्य़ावरील हा विशेष पॉडकास्ट. स्टोरीटेलचे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा आणि ऐका, हजारो गोष्टी...तुमच्या सोयीने, कधीही, कुठेही! https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans

2356 232