सुने, सुने माळरान....

आपल्या एकाहून एक सुरेल गीतांनी आणि कवितांनी मनामनांत निसर्ग जिवंत ठेवणारे रानकवी ना.धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांवर दैनिक लोकमत मध्ये ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला अग्रलेख म्हणजे त्यांचं आगळंपण आणि आपलंपण साठवणारी एक सुरेल शब्दमैफलच. ती फुलवली आहे  संपादक संजय आवटे यांनी. महानोरांचे काव्य, त्यांची प्रतिभा, त्यांचं कार्य आणि त्यांची मातीशी आणि माणसांशी असणारी बांधिलकी अशा अनेक पैलूंची गुंफण आवटे यांनी अत्यंत उत्कट शब्दांत केलेली आहे. असा हा लेख, त्यांच्या सौजन्याने, श्राव्य माध्यमातून आपणापर्यंत पोहोचविला आहे संतोष देशपांडे यांनी. 

2356 232