ikakey: इतिहासाचा अभ्यास का करायचा? Why Is It Important to Study History?

तुम्ही कधी गड किल्ले फिरला आहात, रायगडावर फिरताना प्रत्यक्ष रायगडावरच्या बाजारपेठेत व्यवहार कसे चालायचे आणि आता आपल्या बाजारपेठेमध्ये जे व्यवहार चालतात त्यात काही साम्य आहे ? . सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांमागचा इतिहास तुम्हाला माहितीये का ? भारतामध्ये आज आपण ज्या लोकशाही पद्धतीमध्ये वावरतो ती कुठून आली आणि त्याचे पुढचे टप्पे काय असतील ? युक्रेन रशिया मधील युद्ध तिसऱ्या महायुद्धात कन्व्हर्ट होईल का ?ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर आपण सहावी ते बारावी ची आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र हि पुस्तकं नुसती चालली तरी मिळतील. तरी आपण म्हणतो इतिहास का शिकायचा ? परवा एका मैत्रिणीच्या मुलांनी मला हाच प्रश्न विचारला , आणि मग ठरवलं कि हि इतिहाची पाठपुस्तकं जे लिहितात थेट त्यांनाच हा प्रश्न विचारायचा -इतिहासाचं पाठयपुस्तक उघडलं कि साधार तिसऱ्या चौथ्या पानावर तुम्हाला डॉ. गणेश राऊत हे नाव दिसेल. डॉ गणेश राऊत डॉ. गणेश राऊत यांनी इतिहास या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांचा अध्यापन क्षेत्रात १७ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी इतिहासविषयक ९ संदर्भग्रंथांचं लेखन आणि १६ पुस्तकांचं संपादन केलं आहे.त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे प्रकाशित ‘दत्तक गावांचा इतिहास’ या पुस्तकाच्या दोन खंडांचं संकलन आणि संपादन केल आहे. महाराष्ट्रात त्यांची इतिहास विषयावर १५००हून अधिक व्याख्यानं झाली आहेत. तसंच, मोडी लिपी, हेरिटेज वॉक, किल्ले दर्शन अशा कार्यक्रमांच्या आखणीमध्ये त्यांचा साकीर्य सहभाग असतो. चला तर मग - हि पाठ्यपुस्तक लिहिण्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांना थेट विचारुयात का करायचा आम्ही इतिहासाच्या अभ्यास ?

2356 232