37: झलक- ओसाडवाडीचे देव
ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन् बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात! ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात. चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे. ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी सह: दिलीप प्रभावळकर स्टोरीटेलवर ‘ओसाडवाडीचे देव’ ऐकण्यासाठी [येथे](https://bit.ly/2IuMaVb) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [येथे](http://storytel.com/marathi) क्लिक करा.