15: स्पेस ब्राव्हो.... थरारक असं नवं, ताजं सायन्स फिक्शन

प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्या लेखणीतून साकारलेली आणि आशितोष गायकवाड यांच्या आवाजातून फुललेली `स्पेस ब्राहो` म्हणजे ऑडिओ बुक माध्यमासाठी निर्मित पहिले सायन्स फिक्शन ठरावे. भारताच्या स्पेस मिशनचा सुपर हिरो - ब्राव्हो याला मारण्याचा कट दोन ठिकाणी आखला जातोय , ब्राव्हो त्यातून वाचू शकेल ? सन २०५० मध्ये भारत ही महासत्ता आहे आणि अमेरिका, चीन, रशिया यांसारख्या महासत्तांना अंतराळयुद्धात पुरून उरतो आणि या अफलातून संघर्षाला लाभलेली मानवी भावभावनांची, शह-काटशहांची जोड आणि त्यातून फुललेली ही थरारक, रोमांचकारी मालिका रसिकांना नक्कीच खिळवून ठेवते. या मालिकेच्या आगमनार्थ लेखक संजय सोनवणी यांच्याशी झालेला हा संवाद.  https://www.storytel.in/search-space+bravo

2356 232