12: `इप्सिता` अशी अवतरली!
स्टोरीटेल ओरिजिनल सिरीज `इप्सिता` ने वाचक-श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. नव्या दमाचा लेखक तुषार गुंजाळ यांच्या सहज शैलीतून साकारलेली आणि यशपालने आपल्या आवाजातून ताकदीने श्रोत्यांच्या नजरेपुढे उभी केलेली ही आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारी रोमहर्षक गोष्ट. अशा या इप्सिताच्या निर्मितीमागची गोष्टही तितकीच रंजक आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर सुकीर्तसोबत तुषार आणि यशपालच्या रंगलेल्या गप्पांमधून पाहा ती कशी उलगडते.