7: लाडका मराठी कवी संदीप खरे समवेत दिलखुलास गप्पा @ स्टोरीटेल कट्टा
आजचा आघाडीचा हरहुन्नरी प्रतिभावंत मराठी कवी संदीप खरे `स्टोरीटेल कट्ट्या`वर श्री. संतोष देशपांडे यांच्याशी दिलखुलास बोलता झाला. वाचनाचे आपल्यावर झालेले संस्कार सांगतानाच श्राव्य माध्यमातून उदयास येणारी नवी वाचनसंस्कृती, तो करीत असलेले प्रयोग आदींविषयी त्याचे सहजसुंदर भाष्य ऐकणं हा देखील एक अनुभवच.