शारिरीक, मानसिक स्वाथ्यासाठी Mindful Eating आवश्यक आहे - EP 24 - AVANTI DAMLE
वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता ? आजकाल वजन कमी करायला अनेक डाएट प्लॅन्स खूप महागात विकल्या जातात. पण अवंती दामले ह्यांच्या सारखे आहारतज्ज्ञ अजूनही आपल्या समाजात आहेत ज्यांचं म्हणणं आहे कि वजन काटयाचे गुलाम होऊ नका, स्वस्थ आणि निरोगी राहा, आणि ते राहण्यासाठी फक्त घराचं, स्थानिक, पारंपरिक अन्न खा आणि ते खाताना पंचेंद्रियांचा वापर करा, ह्याला ती midful eating असं म्हणते. Mindful eating म्हणजे नक्की काय, धावपळीच्या आयुष्यात सकस आहार कसा घ्यावा, आपल्या परंपरा पुढच्या पिढीला कश्या समजतील , घरातल्या बाईने स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं तर कसं सगळं कुटुंब स्वस्थ आणि निरोगी राहू शकेल ह्या आणि अनेक गोष्टींवर गप्पा केल्या आहेत अवंती दामले हिच्याशी.