आपली आपली बेटं- माधवी सुदर्शन लिखित कथांचा संग्रह
माणूस एक अजब रसायन आहे. माणसाला बुद्धी आणि भावनांचं वरदान मिळालं आहे,असं आपण म्हणतो . पण हीच बुद्धी भावनांची सरमिसळ आणि अतिरेक झाल्यावर मात्र स्थिर राहू शकत नाही,आणि मग सुरु होतो एक अटळ संघर्ष.माणसाचा माणसाशी आणि स्वतःशीही . या संघर्षात सर्वाधिक फटका बसतो ,तो माणसामाणसातल्या अनमोल नात्याला. भावनांच्या गुंत्यामुळे विविध नाती निभावताना होणारी वेगवेगळ्या टप्यांवरील हीच फरफट आपली आपली बेटं या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य मानावे लागेल. जो माणूस हा संघर्ष योग्य पद्धतीने हाताळू शकतो , तो हा गुंता सोडवतो आणि नातं पुन्हा कोवळ्या पालवीसारखं रिफ्रेश होतं . मात्र ज्यांना हे जमत नाही ,त्यांच्या वाट्याला येतं नात्यांमधील दुभंगलेपण ... एकत्र राहूनही बेटासारखं तुटलेपण !पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/6fcDu6uअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०