आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांविषयी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवनावर घडून आलेल्या बदलांविषयी माहिती देणारे पुस्तक आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक व्यवस्थापन, विविध उत्पादने आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यामध्ये मोलाची भर घातली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मनुष्यासाठी सोप्या झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रत्येक सजीवामध्ये असते. तिचा अभ्यास करून तज्ज्ञांनी मनुष्याच्या विविध समस्या सोडविल्या आहेत. अगदी मुंग्या, मधमाशीपासून ते राजकारणासाठी मनुष्याची विचारप्रक्रिया यांचा अभ्यास करून विविष्ट अल्गोरिदम्स तयार केले जातात. त्यांचा उपयोग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोजनासाठी होतो. हे सूत्र जवळपास सर्वच प्रयोगांमध्ये आहे. त्यातून मनुष्याला उपयुक्त अशा गोष्टींचा शोध कसा लागत गेला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कशी विकसित होत गेली याची रंजक माहिती यातून मिळते. - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी, कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी जिज्ञासा असणारे वाचक तसेच आपल्या सभोवती घडणाऱ्या नव्या बदलांची उत्सुकता असणाऱ्या प्रत्येकालाच हे पुस्तक ज्ञान देणारे आणि त्यातून संशोधनाला प्रेरणा देणारे ठरणारे आहे.पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/3QVMYvKअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०