मॅनॅजमेन्ट माफिया : मॅनेजर म्हणून काम करणारी माणस काय किंवा कामगार असणारी माणस काय दोन्ही प्रकारची माणस कुणाच्या तरी फायद्यासाठी वापरली जातात..

अधिकारी, कर्मचारी, मालक यांच्यातील गुंतागुंत, कामगारांच्या अपेक्षा, मालकाचे व्यावसायिक यश मिळविण्याची धडपड या सर्वाचा मेळ या कादंबरीमध्ये शब्दबद्ध झाला आहे. त्यामुळे ती वाचकाला गुंतवून ठेवते. या पुस्तकातून वाचकाला कॉर्पोरेट विश्वाची ओळख होते. तसेच नोकरीमध्ये यश मिळविण्याची जिद्द, ते मिळविल्यानंतरही त्याची क्षणभंगुरता, मालकांची असहाय्यता वाचक अनुभवतो. एकीकडे आरोग्यदायी स्पर्धा म्हणताना दुसऱ्या बाजूला एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरु असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यातून एक व्यापक पट किंवा बुद्धिबळाचा खेळ वाचकाला वाचनाचा वेगळा आंनद देईल. लेखकाने सोप्या आणि कामगार व कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या भाषेत ही कादंबरी लिहली आहे. त्यामुळे वाचकाला ती गुंतवून ठेवते. ही कादंबरी चित्र रूपाने वाचकाच्या डोळ्यांसमोरून सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.पुस्तक खरेदीची लिंक - https://amzn.eu/d/dVj2htoअधिक माहितीसाठी - ८८८८८४९०५०FaceBook Page link - https://www.facebook.com/sakalprakash...Instagram Page Link - https://www.instagram.com/invites/con...Twitter Page link - https://twitter.com/SakalPrakashan?t=...LinkedIn Link - https://www.linkedin.com/company/saka...spotify link - https://open.spotify.com/show/7dyD2U0...

2356 232