1962 मधील चीन विरुद्धच्या पराभवाची स्फोटक कारणे
१९६२च्या युद्धातील पराभव हा एक राष्ट्रीय पराभव आहे ज्यासाठी प्रत्येक भारतीय जबाबदार आहे. हे सरकारी उच्च पातळीवरील अपयश आहे, विरोधकांचे अपयश आहे, लष्कराच्या उच्च पातळीचे अपयश आहे (ज्यामध्ये माझा पण समावेश आहे), हे जबाबदार प्रसारमाध्यमे आणि जनतेचे पण अपयश आहे. सरकारसाठी हा पराभव म्हणजे सर्व पातळीवरील हिमालयीन घोडचूक आहे.” ‘Himalayan Blunder’ हे पुस्तक जवळपास ५३-५४ वर्षांपूर्वी लिहिले असले तरी यात नमूद केलेले मुद्दे अगदी आजही तितकेच महत्वपूर्ण आहेत.