श्रीराम राम हे म्हणा आणि पावन भिक्षा | सौ जयश्री बा . बनतोडे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।श्रीराम राम हे म्हणासुरेंद्र चंद्रशेखरू । अखंड ध्यातसे हरू। जनासि सांगतो खुणा । श्रीराम राम हे म्हणा महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती । सलाभ होतसे दुगा । श्रीराम राम हे म्हणा बिचें ग्रहून जाळिलें। विशेष अंग पोळिले । प्रचीत माझिया मना। श्रीराम राम हे म्हणा विशाल व्याळ व्यम्तकी। नदी खळाळ मस्तकी। ऋषी भविष्य कारणा। श्रीराम गम हे म्हणा अपाय होत चूकला। उपाय हा भला भला। नसे जयासि तूळणा । श्रीराम राम हे म्हणा बहूत प्रयत्न पाहिले । परंतु सर्व राहिले । विबुधपक्षरक्षणा । श्रीराम राम हे म्हणा विरामध्ये विरोत्तमू । विशेष हा रघोत्तमू ।सकाम काळआंकणा । श्रीराम राम हे म्हणा