Firtya Chakavarati Deshi फिरत्या चाकावरती देशी / सौ मेधा जोरापुरकर ताई
सौ मेधा जोरापुरकर ताई फिरत्या चाकावरती देशी फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळीशी तू तूच तोडीशी न काळे यातून काय जोडीशी देसी डोळे परी निर्मिसी तयांपुढे अ