याजसाठी केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
संत तुकाराम महाराज यांचा अभंग अंजली अशोक जोशी ताईं नी सादर याजसाठी केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥ आता निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥ ४॥