तू माझा यजमान रामा आणि हि राम नाम नौका भवसागरी तराया (भैरवी)

89 वर्षाच्या (श्रीमती सुमन दत्तात्रय घाटे ) आजी यांनी म्हटलेले सुंदर भजन आणि भैरवी.तू माझा यजमान रामा,तू माझा यजमान ||धृ||जननी जठरी रक्षियले मज,पोसुनी पंचहि प्राण ||१||बाहेर निघता मातेचे स्तनी,पय केले निर्माण ||२||ऐसे असता या पोटाची,का करू चिंता जाण ||३||मध्व मुनीश्वर स्वामी रमापती,धरी माझा अभिमान ||४||आणि ही रामनाम नौका | भवसागरी तराया ||मद, मोह लोभ सुसरी | किती डंखिती विषारी |ते दुःख शांतवाया | मांत्रिक रामराया ||सुटले अफाट वारे | मनतारू त्यात बिथरे |त्या वादळातुनी या नेईल रामराया ||भ्रम भोवऱ्यात अडली | नौका परी न बुडली |धरुनी सुकाणू हाती | बसलेत रामराया ||आम्ही सर्वही प्रवासी | जाणार दूरदेशी |तो मार्ग दाखवाया | अधिकारी रामराया ||हा देह नाशिवंत | जाण्यास ना समर्थ |तारी तारी रामराया | दीनदास लागे पाया ||

2356 232