गावकळा :-स्वच्छतेचा मुलमंत्र देणारी कादंबरी:
आज प्रदीप धोंडीबा पाटील यांना जाऊन जवळपास दोन वर्षे होत आहेत. करोना सारख्या माहामारीने एक प्रतिभावंत साहित्यिक काळाने हिरावून घेतला. पण त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. खान्देशी रेडिओ व गोरबोली रेडिओ यांच्या #अंतरायणाचे 19 अंतरंग या सदरात प्रा. व्यंकटेश सोळंके यांच्या गणगोत प्रकाशन प्रकाशित अक्षरायण समीक्षा ग्रंथाचे प्रकट वाचन चालू आहे. यानिमित्ताने प्रदीप धोंडीबा पाटील यांच्या स्मृतीस एक उजाळा मिळत आहे. प्रतिभावंत साहित्यिक कधी मरत नसतो तो प्रतिभेच्या रुपाने जीवंत आपणात असतो...