उठ भो,,, ... दिनेश चव्हाण चाईसगाव
अहिराणी रचना उठ भो,,, ----------------------------- कोन काय म्हनी गड्या कसाले कराना इचार . खरानी वाट सोडिसन, कोठे व्हवू नका लाचार. आपलं गाड आते भो आपलेच व्हडनं शे,, सुख दुःख आपलं मानी आपलेच लढनं शे,,, नाता गोता आठेच भो जातस समधा वाही. कोन नही येस दादा संकटमान आठे धायी. माय बापनी जनम दिन्हा दादा हाईच खरं शे,, गुपित कोन्हले सांगू नका, सांगा समधं बरं शे,,, काष्टानी वाट सोडीसन कोन्हलेच कोसू नका. नशिबच सालं फुटेल शे, म्हनीसन रडत बसू नका. ...........@दिनेश चव्हाण चाईसगाव