निकोल व्हॅविलोव
निकोल व्हॅविलोव हा सोव्हिएत रशियामधील एक जीवशास्त्रज्ञ, जनुकशास्त्रज्ञ आणि कृषीतज्ञ होता. त्याचा जन्म २५ नोव्हेंबर १८८७ रोजी मास्को येथे झाला. जनुक शास्त्राचे जनक मानले जाणारे विल्यम बॅट्सन हे त्याचे गुरू. ते केंब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी होते. लंडनच्या जॉन इन्स हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूटमधून त्याने शिक्षण घेतले. पुढे तो रशियाच्या सारातोव्ह युनिव्हर्सिटीमधे वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला. स्टालिनने त्याला रशियाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रवक्ते म्हणूनही नेमले. --- Send in a voice message: https://anchor.fm/dr-rakshit-bagde/message