शहीदाची औलाद तू... कवी भीमणीपुत्र-मोहन नायक
शहीदाची औलाद तू... रे.. आदिवासी या देशाचा भूमिपुत्र होतास राव झालास वनवासी रावाचं रंक करणाऱ्या त्या संस्कृतीला झिडकार तू लाथेने! रे...मूलनिवासी या देशाचा रक्षक होतास आद्यवासी झालास राक्षस रक्षकाचे राक्षस करणाऱ्या त्या नराधमांना उडव तू ठोकराने! रे.. आद्यवासी घेतो आहेस फासी तुला फासी घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या त्या व्यवस्थेला तुडव तू पायाखाली! रे.... शंकरशहा,बिरसा,तंट्या भील, उमाजी नाईक,गोविंद गोर.. या देशासाठी झालेत शहीद पण ठरलेत चोर गुन्हेगार! झालास जरी शहीद तू... तरी चालेल शहीदाची औलाद