Episode 1 Shyaamchi Aai..Prarambh
अध्यापन कार्य समाजसेवा स्वातंत्र्ययुद्ध अशा बहुविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सानेगुरुजी मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमर आत त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहिले समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी एकता निर्माण व्हावी दैन्य दारिद्र्य दूर व्हावे या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले लहान मुले स्त्रिया तरुण दीनदलित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी व उत्तमोतम विचारांची देणगी मिळावी यासाठी अत्यंत संस्कारक्षम असे साहित्य त्यांनी निर्माण केले. यापैकीच एक सर्वोत्कृष्ट आणि उच्च धर्म दर्जाची निर्मिती म्हणजेच हे पुस्तक 'श्यामची आई'. महाराष्ट्रातील प्रत्येक घर सानेगुरुजींच्या विचारांनी पावन व्हावे हीच एकमेव इच्छा.सादरीकरण डॉक्टर मनीषा जाधव ( पुस्तकप्रेमी च्या कट्ट्यावरून)