निवडक यात एकूण सात कथा,श्रीमंत बाजीराव पेशवे हे नाटक,कोडिंग-डीकोडिंग या कादंबऱ्या असेभाग केलेले आहेत

निवडक पुस्तकाचे संपादन सुनील जोशी आणि प्रमोद बापट यांनी केले आहे. यात लेखक गिरीश दाबके यांनी केलेले जीवनाविषयीचे मुक्तचिंतन आलेले आहे. मुक्तछंदात लेखक स्वतःशीच कसा संवाद साधतो हे त्यांच्या लेखणीतून दिसून येते. काळानुसार होणारा संघर्ष गिरीश आपल्या कथेतून अतिशय प्रभावीपणे मांडतात.त्यांच्या ‘लय-प्रलय’ या कादंबरीतून अनेक पात्रांना त्यांनी सचित्र उभे केले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजवाद, साम्यवाद, सावरकरांचे हिंदुत्व तठस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी लेखन केले असून, त्यातील निवडक लेखन ‘निवडक डॉ. गिरीश दाबके’ या पुस्तकातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे

2356 232