Episode 1: महानुभावपंथीय प्रायश्चित। प्रातःकालीन प्रार्थना। प्रायश्चित करतांना काय म्हणायला पाहिजे

Check out my latest episode! Episode 1: महानुभावपंथीय प्रायश्चित। प्रातःकालीन प्रार्थना। प्रायश्चित करतांना काय म्हणायला पाहिजेप्रायश्चित म्हणजे परमेश्वराजवळ आपल्या पापकर्माची माफी क्षमा मागणे, क्षमा याचना करणे. प्रायश्चित हे महानुभावपंथ/ जयकृष्णी धर्मामध्येच सांगितलेले आहे कारण ईश्वर अवतारा शिवाय कोणी आम्हाला पापकर्माच्या दंडापासून वाचवू शकत नाहीत. म्हणुन जय कृष्णी धर्मामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व बंधू भगिनीनी अवश्य या सुसंधीचा फायदा करून घ्यावा.अनंत जन्मापासून आम्ही केवळ पापकर्मे करीत आलो आहोत. परमेश्वराचे भजनपूजन स्मरण यासाठी केवळ दहा-वीस मिनिटे ही वेळ मिळत नाही. २४ तास आपण काय करतो, हे प्रत्येक जीवात्मा आपल्या मनात डोकावून पाहु शकतो. ही अनंत जन्मातील पापकर्म भोगून सुध्दा संपत नाहीत कारण दररोज नवी नित्य पापकर्म आमच्या कडून घडत असतात, जोडली जात असतात.

2356 232